येथे क्षणभरी मृत्यूही ओशाळला ।

‘योगेश व्हनमारे यांनी मृत्यूसमयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर देवाने माझ्याकडून व्यक्त करून घेतलेले काव्यरूपी मनोगत पुढे दिले आहे.

योगेशने योगविद्येने ।

मृत्यूत्तर मृत्यूवरही विजय प्राप्त केला ।

मग येथे क्षणभरी मृत्यूही ओशाळला ॥ १ ॥

प्रारब्धाचे वेढे कुणासी का सुटले ।

परी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाने, ते सहजी सोडवले ।

चुकता आत्यंतिक खंत वाटोनी, क्षमायाचना ती केली ।

अंतर्मुखतेतून आत्मपरीक्षण करूनी, अंतरी धर्म जोपासला ।

मग इथे यमधर्मही प्रसन्नची जाहला ॥ २ ॥

चित्रगुप्ताने खाते पाहिले पापांचे ।

गुरुकृपायोगाने त्यांचे परिमार्जन जाहले ।

पुण्याचे पारडे जड जाहले ।

मग येथे चित्रगुप्तही आनंदूनी गेला ।

गुरुकृपेची महती साधकांच्या चित्ती ठसवली ।

योगेशा, नमन करतो मी तुजला,

योगेशा, नमन करतो मी तुजला ॥ ३ ॥

गुरुदेवा, अखंड कृतज्ञता व्यक्त करतो तव चरणी ।

योगेशसम गुरुबंधू आम्हासी दिधला ।

त्याचा सदैव आदर्श ठेवूनी मनी ।

व्हावी पुढील साधना क्षणोक्षणी ।

ऐसा द्यावा आम्हासी आशीर्वाद ।

ही समष्टी प्रार्थना विनम्रभावे अर्पितो तव मंगल चरणी ॥ ४ ॥

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (३०.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF