धर्मप्रेमींमध्ये वीरश्री निर्माण करणार्‍या जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रावधी हिंदूंची उपस्थिती

डावीकडून सद्गुरु नंदकुमार जाधव, आमदार श्री. टी. राजासिंह, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव, १३ जानेवारी (वार्ता.) – धर्मप्रेमींमध्ये वीरश्री निर्माण करणार्‍या आणि धर्मद्रोह्यांना धडकी भरवणार्‍या जळगाव येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेला सहस्रावधी हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली. १३ जानेवारी या दिवशी येथील शिवतीर्थ मैदानावर ही सभा पार पडली. भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह, सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी त्यांच्या प्रखर वाणीतून उपस्थितांना संबोधित केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now