पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! केवळ दर्शन नोंदणीसाठी शुल्क आकारणे, हे मंदिराच्या ठिकाणी ‘धंदा’ करण्यासारखे नाही का ?

पंढरपूर – येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय १२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला, अशी  माहिती साहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. या बैठकीसाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नंडगिरी, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर जळगावकर उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मागील काही वर्षांपूर्वी ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणी चालू केली होती. यामुळे भाविक त्याच वेळेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येत होते.


Multi Language |Offline reading | PDF