कर्नाटकमध्ये कन्नड भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’ ठरले सर्वांत लोकप्रिय ‘अ‍ॅप’ !

कर्नाटकातील ‘दैनिक विजय कर्नाटक’च्या ‘टेक्नॉलॉजी वार्ता’ सदरात स्थान

कन्नड भाषेतील सनातन पंचांगचे ‘अ‍ॅप’

बेंगळूरू – कन्नड भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’ हे सर्वांत लोकप्रिय ‘अ‍ॅप’ ठरले आहे. ‘दैनिक विजय कर्नाटक’ने त्याच्या ११ जानेवारी या दिवशीच्या अंकातील ‘टेक्नॉलॉजी वार्ता’ पुरवणीमधील ‘फेवरेट अ‍ॅप्स’ या सदरात सनातन पंचांगाच्या या ‘अ‍ॅप’ची माहिती प्रसिद्ध केली आहे. यात म्हटले आहे, ‘सनातन पंचांग २०१९’ हे ‘अ‍ॅप’ पुष्कळ उपयुक्त असून त्यात भारतीय संस्कृतीनुसार, तसेच तिथीनुसार सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यासह हिंदूंच्या आराध्य देवतांची अत्यंत सुबक चित्रे, हिंदु धर्माविषयीचे संक्षिप्त लेख, भारतीय सुट्ट्यांच्या दिवसांची माहितीही देण्यात आली आहे. अध्यात्मात रूची असल्यास त्या विषयीचीही माहिती या ‘अ‍ॅप’मध्ये आहे. सर्व माहिती कन्नड भाषेत असल्याने हे एक अत्यंत उपयुक्त अ‍ॅप आहे.’ ‘विजय कर्नाटक’ या वृत्तपत्राचे ६ लाख वाचक आहेत.


Multi Language |Offline reading | PDF