विजयपूर येथील भारतीय संस्कृती उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

प्रदर्शन पहातांना १. पू. श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी २. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. व्यंकटरमण नायक

विजयपूर – येथील सिद्धेश्‍वर संस्था आणि बागलकोट येथील बसवेश्‍वर वीरशैव विद्यावर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भारतीय संस्कृती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्यात आले.

प्रदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि मिळालेला प्रतिसाद

१. तीन शाळांमधील अनुमाने ५४० विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीच्या आचरणाविषयी आणि आपले नूतन वर्ष हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी सविस्तर समजावून सांगण्यात आले. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य प्रशंसनीय आहे. समितीमुळे आम्हाला भारतीय संस्कृतीविषयी उपयुक्त माहिती मिळाली’, असे सांगितले.

२. अनुमाने ५ वर्षांपासून एक धर्मप्रेमी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने विकत घेण्यासाठी वाट पहात होते; परंतु त्यांना ती कुठेच मिळाली नाहीत. ‘या उत्सवात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन असेलच म्हणून सात्त्विक वस्तू घेण्यासाठी उत्सवाला आलो आहे’, असे ते म्हणाले.

३. एका धर्मप्रेमीला उत्सवाच्या ठिकाणी एक विशिष्ट सुगंध आला. ‘हा सुगंध म्हणजे सनातनचे ग्रंथप्रदर्शन येथे असलेे पाहिजे’, असा विचार त्या धर्मप्रेमींच्या मनात आला; म्हणून ते शोधत प्रदर्शनस्थळी आले आणि त्यांनी सात्त्विक उत्पादने खरेदी करून आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले.

४. उत्सवमंडळाकडून संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला पूर्ण सहकार्य मिळाले.

५. ‘विजय कर्नाटक’ नियतकालिकाच्या वार्ताहरांनी स्वतःहून संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्याविषयीची बातमी वृत्तपत्रात छापली.

विजयपूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे पू. श्री सिद्धेश्‍वर स्वामी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी बागलकोट जिल्ह्याचे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. व्यंकटरमण नायक यांनी स्वामीजींना ग्रंथांची माहिती सांगितली. या संदर्भात पू. श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी म्हणाले की, तुमचे गुरु प.पू. डॉ. जयंत आठवले हे महान आहेत. सनातनचे कार्य उत्तम आहे.


Multi Language |Offline reading | PDF