नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी नलिनी चिदंबरम् यांना अंतरिम जामीन

शारदा चिटफंड घोटाळा

‘एअरसेल-मॅक्सिस’ घोटाळ्यात चिदंबरम् पिता-पुत्र यांचा आणि आता गुंतवणूक  घोटाळ्यात त्यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम् यांचा सहभाग उघड झाला ! अशा घोटाळेबाज कुटुंबाच्या प्रमुखाला देशाचे गृहमंत्री आणि अर्थमंत्रीपद देणार्‍या काँग्रेसवर बंदी घातली पाहिजे !

कोलकाता – गुंतवणूक योजनेत अधिक व्याजाचे आकर्षण दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम् यांच्या विरोधात सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले. (२०१०-१२ मध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणात ९ वर्षांनी आरोपपत्र प्रविष्ट होते ! आता खटला चालून संबंधितांना आणखी किती वर्षांनी शिक्षा होणार ? – संपादक) बंगालमधील न्यायालयातून नियमित जामीन मिळेपर्यंत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम् यांना मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला.

शारदा चिटफंड घोटाळ्यात गुंतलेल्या ‘शारदा कंपनी समूहा’कडून नलिनी चिदंबरम् यांना १ कोटी ४० सहस्र कोटी रुपये मिळाल्याच्या आरोपाखाली सीबीआयने आरोपपत्र प्रविष्ट केल्यावर अटकेच्या भीतीने नलिनी यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज प्रविष्ट केला. यावर सुनावणी करतांना न्यायधिशांनी अंतरिम जामीन दिला. त्यांना एग्मोरच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर शरण येण्याचे निर्देश देऊन हमीदार सादर करण्यास, तसेच बंगालमधील संबंधित न्यायालयात जाऊन नियमित जामीन मिळवण्यास सांगितले. विशेष सरकारी अधिवक्त्या जी. हेमा यांनी नलिनी चिंदबरम् यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now