काश्मीरमधील कुख्यात आतंकवादी झीनत उल् इस्लामचा खात्मा

  • एक एक आतंकवादी ठार मारण्यापेक्षा आतंकवाद्यांचे उगमस्थान असलेल्या पाकला धडा शिकवल्यास काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात यायला वेळ लागणार नाही; मात्र हे भाजप सरकारला समजेल, तो सुदिन !
  • ‘काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आतंकवादी निर्माण कसे होतात ?’, ‘त्यांना कुठल्या ग्रंथांतून प्रेरणा मिळते ?’, ‘त्यांना कोण पाठिंबा देतो ?’, ‘त्यांचे आश्रयदाते कोण आहेत ?’, ‘त्यांना सर्वतोपरी साहाय्य कोण करतो ?’, हे भाजप सरकार जनतेसमोर का उघड करत नाही ? कि त्यांना मतपेढीवर परिणाम होण्याची भीती वाटते ? लोकहो, भाजप सरकारला या प्रश्‍नांची उत्तरे विचारा !

श्रीनगर – सैन्यदलाने काश्मीरमधील कुख्यात आतंकवादी झीनत उल् इस्लाम याचा चकमकीत खात्मा केला. इस्लामसह त्याचा एक साथीदारही ठार झाला. १२ जानेवारीला रात्री आतंकवादी आणि सैन्यदल यांच्यात चकमक झाली. सैन्याने घटनास्थळावरून ‘एके-४७ रायफली’सह इतर शस्त्रसाठाही जप्त केला आहे. इस्लाम हा ‘मोस्ट वॉन्टेड’ आतंकवादी होता, तसेच तो ‘आय.ई.डी’ स्फोटके बनवण्यात तज्ञ होता. यापूर्वी तो ‘हिजबुल मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेत कार्यरत होता. तथापि तो नुकताच ‘अल् बदर’ या संघटनेत सहभागी झाला होता.

कुलगाम जिल्ह्यातील कटपोरा भागात आतंकवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली. त्यानंतर १२ जानेवारीला सायंकाळी सैन्याच्या ‘राष्ट्रीय रायफल्स’ने, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्यासह संयुक्तपणे शोधमोहीम चालू केली. सैन्याने आतंकवादी लपून बसल्याच्या परिसराला घेराव घातला. या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. आरंभी सैन्याने दोघा आतंकवाद्यांना शरण येण्यास सांगितले; मात्र तरीही त्यांनी आक्रमण चालूच ठेवले. या आक्रमणाला सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत दोघा आतंकवाद्यांचा खात्मा केला.


Multi Language |Offline reading | PDF