नृत्य करून व्रतबंध सोहळ्यातील पावित्र्य नष्ट करणारे हिंदूंचे अनुचित वर्तन आणि हिंदूंना असलेली धर्मशिक्षणाची आवश्यकता !

‘मला एका बटूच्या व्रतबंधन संस्काराच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. त्यामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्या बटूचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी नाच केला. हिंदु धर्मात बटूने ज्ञानार्जन करून आणि गुरुगृही साधना करून आध्यात्मिक प्रगती करवून घेण्यासाठी त्याचा व्रतबंध संस्कार केला जातो. अशा कार्यक्रमांमधून नाच गाण्याचा कार्यक्रम होणे, हा हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव दर्शवतो. हे सर्व पाहिल्यावर धर्मशिक्षण आणि संत सांगत असलेल्या हिंदु राष्ट्राची निर्मिती यांची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.’

(व्रतबंधन एक पवित्र आणि आध्यात्मिक स्तरावरील संस्कार आहे. व्रतबंधनापासूनच बटूच्या साधनेचा प्रारंभ होत असतो. त्या संस्कारसोहळ्याचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्यच आहे; परंतु विदेशी संस्कृतीच्या कुबड्या लावून लंगडत जीवनप्रवास करणार्‍या आंग्लाळलेल्या तथाकथित शिक्षितांना जीवन आनंदी करणारा महान हिंदु धर्म आणि स्वसंस्कृती यांचे महत्त्व कसे कळणार ? यासाठीच धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाचा समाजातील अधिकाधिक हिंदूंनी लाभ करून घ्यायला हवा !’ – संकलक)

– एक साधक (१०.३.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now