खर्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी अन्वेषण यंत्रणा विज्ञानाचा आधार का घेत नाहीत ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने आरोपपत्रात सनातन प्रभातचे माजी संपादक कै. शशिकांत राणे यांनी आरोपींना ‘फंडिंग’ केल्याचा उल्लेख केला आहे. कै. शशिकांत राणे यांच्यासारख्या निरपराध, कायद्याचे पालन करणार्‍या आणि साधकत्व असलेल्या व्यक्तीचे नाव अन्वेषण यंत्रणांनी अशा प्रकारे मलीन करणे, हे दुर्दैवी आहे. आजच्या विज्ञानयुगात खरा आरोपी कोण आणि निर्दोष कोण हे ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यु.टी.एस्.), ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’ (पिप), ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (जीडिव्ही) यांसह अन्य अनेक यंत्र-उपकरणांसह शोध घेतल्यास सिद्ध करता येऊ शकते. कथित विचारवंतांच्या हत्यांमधील खरे आरोपी शोधण्यासाठी स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे आणि अन्वेषण यंत्रणा विज्ञानाचा आधार घेऊन सत्य का शोधत नाहीत ? असा प्रयत्न त्यांनी केल्यास कोणता अधिवक्ता खोटे बोलतो, हेही त्यांना कळून येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था.


Multi Language |Offline reading | PDF