कोलकाता येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे चित्रपटगृहावर आक्रमण

‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाला विरोध

  • ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करणार्‍या हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवणारे अभिनेते, अभिनेत्री, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे यांची अशा वेळी दातखिळी कशी बसते ?
  • हिंदूंनी वैध मार्गाने केलेला विरोध डावलून सरकार हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन असलेल्या चित्रपटांना अभय देते, तर काँग्रेसी टोळी थेट कायदा हातात घेऊन चित्रपटगृहाचे खेळ बंद पाडते ! यावरून ‘सरकारला हीच भाषा समजते’, असे समजायचे का ?

कोलकाता – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या वादग्रस्त कारकीर्दीवर आधारित असलेला ‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या हिंदी चित्रपटाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. या चित्रपटाच्या निषेधार्थ काँग्रेसींनी शहरातील प्रसिद्ध ‘क्वेस्ट मॉल’मधील ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहावर आक्रमण केले. कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा खेळ बंद पाडत चित्रपटगृहातील पडदा फाडून टाकला. (हिंदूंनी केलेल्या विरोधाला ‘व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी’ ठरवणार्‍या पुरोगामी टोळीला आता काँग्रेसींचा हा धूडगूस ‘व्यक्तीस्वातंत्र्याचे संवर्धन’ वाटते का ? हिंदूंनो, अशा ढोंगी पुरोगामी टोळीचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा समाजासमोर उघड करा ! – संपादक) ‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट ११ जानेवारीला देशभर प्रदर्शित झाला. त्या दिवशी काँग्रेसींनी कोलकात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन करत या चित्रपटाचा निषेध केला.

११ जानेवारीला रात्री ८.३० वाजता काँग्रेसचे काही कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत या चित्रपटगृहात घुसले. ‘मॉल’च्या सुरक्षायंत्रणेला त्यांना रोखणे शक्य झाले नाही. हा जमाव थेट चित्रपटगृहात घुसला आणि तेथील पडदाच फाडून टाकत चित्रपटाचा चालू असलेला खेळ बंद पाडला.

पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

राहुल गांधी यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीची मते काँग्रेसचेच कार्यकर्ते वाचत नाहीत ! – अभिनेते अनुपम खेर

सदर चित्रपटात डॉ. मनमोहन सिंह यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या घटनेविषयी राहुल गांधी यांच्या नावे ‘ट्वीट’ करून ‘तुमचेच कार्यकर्ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीची तुमची मते वाचत नाहीत’, अशा शब्दांत टीका केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now