आलोक वर्मा यांनी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना पसार होण्यासाठी केले साहाय्य !

केंद्रीय दक्षता आयोगाचा गंभीर आरोप

  • पोलीस चोरांना देशाबाहेर पळून जाण्यास साहाय्य करत असतांना गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? यावरून गुप्तचर यंत्रणांची अकार्यक्षमता सिद्ध होते ! सरकार यावर योग्य ती पावले उचलणार का ?
  • गुन्हे उघड करणार्‍यांनीच गुन्हे करणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. यावरून अन्वेषण यंत्रणांचा अंतर्गत कारभार कसा चालतो, हे उघड होते !

नवी देहली – सीबीआयमधील अंतर्गत वादातून अनेक गोष्टींचा खुलासा होऊ लागला आहे. सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी बँक घोटाळ्यातील पसार आरोपी नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि ‘एअरसेल’चे माजी अधिकारी सी. शिवशंकरन् यांना देशाबाहेर पळून जाण्यास साहाय्य केल्याचा आरोप केंद्रीय दक्षता आयोगाने केला आहे. (एखाद्या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून गुन्ह्याचे अन्वेषण योग्य प्रकारे होत नसेल, तर पीडित व्यक्ती किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती अन्वेषण जलदगतीने होऊन न्याय मिळण्यासाठी प्रकरण ‘सीबीआय’कडे पाठवण्याची मागणी करतात; मात्र आता गुन्हेगारांना साहाय्य करणार्‍या सीबीआयवर जनतेने विश्‍वास तरी कसा ठेवावा ? – संपादक)

१. सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेल्या मागणीवरून केंद्रीय दक्षता आयोगाने वर्मा यांच्यावरील आणखी ६ आरोपांची चौकशी करण्यास आरंभ केला आहे. यांमध्ये पसार आरोपींना वर्मा यांनी साहाय्य केल्याची माहिती सरकारला देण्यात आली आहे.

२. केंद्रीय दक्षता आयोगाने २६ डिसेंबर या दिवशी सीबीआयला पाठवलेल्या पत्रात काही गंभीर सूत्रे उपस्थित केली आहेत.

त्यात नमूद केल्यानुसार वर्मा यांनी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांच्या संदर्भातील काही महत्त्वाची संगणकीय पत्रे ‘लिक’ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वर्मा यांच्या कार्यकाळात म्हणजे जून २०१८ मध्ये नीरव मोदी यांचे अन्वेषण करणारे तत्कालीन संयुक्त संचालक राजीव सिंह यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते, तसेच संगणकांतील ‘डेटा’ मिळण्यासाठी प्रौद्योगिक मंत्रालयातील ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआर्टी)’लाही बोलावण्यात आले होते. हे कशासाठी केले, याचे कोणतेही कारण त्या वेळी देण्यात आले नव्हते.

३. ‘एअरसेल’चे सर्वेसर्वा आणि ६०० कोटींचा बँक घोटाळा करणारे सी. शिवशंकरन् यांची संयुक्त संचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘पांच सितारा हॉटेल’मध्ये जाऊन भेट घेतली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now