काश्मीरमधील ३५ शीख पंच-सरपंचांचे त्यागपत्र

आतंकवाद्यांनी शीख नागरिकाची हत्या केल्याचा निषेध

  • काश्मीरमधील देशद्रोह्यांच्या मृत्यूला ‘हत्या’ संबोधत पदाचे त्यागपत्र देणार्‍या मुसलमान सनदी अधिकार्‍याच्या बाजूने गळे काढणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, ३० शीख सरपंचांच्या त्यागपत्राविषयी एका ओळीचीही बातमी देत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • असे त्यागपत्र देऊन कोणावर काहीही परिणाम होणार नाही, हे शिखांनी जाणावे आणि परिणामकारक संघटनाद्वारे न्याय मिळण्यासाठी सरकारवर दबाव आणावा !

श्रीनगर – काश्मीरमधील पुलवामा येथे आतंकवाद्यांनी शीख सरपंचाच्या भावाची हत्या केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सरपंच आणि पंच अशा ३५ जणांनी प्रशासनाकडे त्यागपत्रे दिली. ‘आतंकवाद्यांच्या या कृतीमुळे काश्मीरमधील शीख-मुसलमान मैत्रीला काळीमा फासला गेला आहे’, असे शिखांच्या या गटाने म्हटले आहे. (अद्यापही शीख-मुसलमान मैत्रीच्या दिवास्वप्नात रमणारे काश्मीरमधील शीख ! आता तरी शीख बांधवांचे डोळे उघडतील का ? – संपादक)

डिसेंबर २०१८ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका संपल्यावर त्यापुढील आठवड्यात आतंकवाद्यांनी त्रालमधील खसीपोरा गावाचे सरपंच राजेंद्र सिंह यांचे बंधू सिमरनजीत सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर ‘ऑल पार्टी शीख कोऑर्डिनेशन कमिटी’चे अध्यक्ष जगमोहनसिंह रैना यांच्या नेतृत्वाखाली शिखांच्या गटाने पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी पुलवामा जिल्ह्यातील शीख पंथातील सरपंच आणि पंच यांनी त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला.

या वेळी जगमोहनसिंह रैना म्हणाले, ‘‘आम्हाला सिमरनजीत सिंह यांचे मारेकरी कोण आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. ‘सिमरनजीत सिंह यांना न्याय मिळावा’, अशी आमची मागणी आहे. पोलिसांच्या अन्वेषणातही काही प्रगती झालेली नाही. हुरियत कॉन्फरन्सनेही या हत्येचा निषेध करावा, असे आम्हाला वाटते; परंतु ते गप्प आहेत. (हिंदुद्वेषाने पछाडलेल्या हुरियतकडून अशी अपेक्षा करणे हास्यास्पद ! – संपादक) शिखांना सुरक्षा देण्याच्या संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे शीख समुदायात भितीचे वातावरण पसरले आहे.’’ निवडणुकीच्या वेळी आतंकवाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे निवडणूक लढवण्यासाठी पुढे येणार्‍यांचे प्रमाण अल्प होते. बहुतेक भागांमध्ये शीख समाजातील लोकांनी निवडणूक लढवली आणि ते बिनविरोध निवडून आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now