एप्रिल २०१८ मध्ये सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक कै. शशिकांत राणे यांच्या अंत्यविधीच्या पूर्वी त्यांच्या पार्थिवाचे वैज्ञानिक संशोधन केल्यावर ते सकारात्मक असल्याचे निष्पन्न !

कै. शशिकांत राणे

‘सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक कै. शशिकांत राणे यांच्या पार्थिवावर ७ एप्रिल २०१८ या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी त्यांचे पार्थिव रामनाथी आश्रमात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. तेव्हा त्याची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून ‘यू.टी.एस्.’ (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या ऊर्जा मापक उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. पार्थिवातील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्याची प्रभावळ यांविषयी केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. अंत्यदर्शनाच्या वेळी कै. राणेकाकांचा मृत्यू होऊन अडीच दिवस उलटल्याने मृतदेहाचे शिळेपण घालवण्यासाठी पार्थिवावर पंचगव्य आणि तुळशीच्या मुळातील माती यांचे प्रोक्षण करण्यात आले होते. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आले. त्यानंतर पार्थिवाच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या सर्व केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. याचे विवेचन साररूपाने खालील सारणीत दिले आहे.

१. कै. शशिकांत राणे यांच्या पार्थिवाच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी

२. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ अ. साधनेमुळे आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचा स्थूलदेहावरील सकारात्मक परिणाम : सर्वसाधारण व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते. व्यक्ती मृत झाल्यावर, तसेच मृत्यू होऊन अडीच दिवस उलटल्यावर आणि या अडीच दिवसांत मृतदेह शवागरात राहिल्यावर त्या मृतदेहात नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता अधिकच वाढते. कै. राणेकाका यांच्या पार्थिवात मात्र नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही; परंतु कै. राणेकाका यांच्या पार्थिवातून सकारात्मक ऊर्जेची स्पंदने १.४० मीटर दूरपर्यंत जाणवली. सर्वसामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. खरेतर मृत्यूनंतर ही प्रभावळ न्यून होते. कै. राणेकाका यांच्या पार्थिवाची प्रभावळ मात्र २ मीटर होती. या सर्वांचे कारण ‘कै. राणेकाका यांनी केलेल्या साधनेमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यामुळे त्याचा त्यांच्या देहावर आध्यात्मिकदृष्ट्या झालेला सकारात्मक परिणाम’, हे आहे.

२ आ. अंत्यविधींचा सकारात्मक परिणाम : दहनापूर्वीच्या अंत्यविधींच्या पूर्वीच्या तुलनेत दहनापूर्वीच्या अंत्यविधींनंतर केलेल्या निरीक्षणात कै. राणेकाका यांच्या पार्थिवातील सकारात्मक ऊर्जेची स्पंदने ४० सें.मी. वाढली आणि त्यांची प्रभाव ७० सें.मी. वाढली. यावरून हिंदु धर्मात सांगितलेल्या अंत्यविधींचे महत्त्वही येथे लक्षात येते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.४.२०१८)

एकूणच सांगायचे झाले, तर आपले जीवन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वाहिलेल्या निःस्वार्थी वृत्तीच्या कै. शशिकांत राणे यांच्यामधील सात्त्विकता वैज्ञानिक स्तरावर सिद्ध होते ! त्यांच्याविरोधात बेताल वक्तव्ये नि आरोप करणार्‍या तपासयंत्रणा याचा अभ्यास करतील का ? – संपादक


Multi Language |Offline reading | PDF