सावंतवाडी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विविध स्तरांवर प्रसार !

समितीच्या कार्यकर्त्यांकडून मान्यवरांना सभेचे निमंत्रण !

युवराज श्रीमंत लखमराजे भोसले (उजवीकडे)
बबन साळगावकर (डावीकडे)
सौ.अन्नपूर्णा कोरगावकर (डावीकडे)
जयवंत जावडेकर (उजवीकडे)

सावंतवाडी,१२ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नष्ट करण्याचे कारस्थान शासनकर्त्यांनी केल्याने हिंदूंमध्ये स्वधर्माविषयी प्रचंड अज्ञान आहे.परिणामी हिंदूंमध्ये धर्माविषयी उदासीनता निर्माण झाल्याने धर्माकरता हिंदू संघटित होत नाहीत. हिंदू असंघटित राहिल्याने भारतात हिंदू बहुसंख्यांक असूनही स्वधर्मावर धर्मांतर,गोहत्या,लव्ह जिहाद,मंदिरांचे सरकारीकरण यांसारखी असंख्य आक्रमणे होत आहेत.हिंदूंवर होणार्‍या या आघातांविषयी प्रभावी उपायोजना करण्याचा साधा प्रयत्नही शासन करत नाही. याकरता हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करण्यासमवेत हिंदूंना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० जानेवारी २०१९ या दिवशी सावंतवाडी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेच्या प्रचारार्थ सावंतवाडी पंचक्रोशीत धर्मप्रेमींच्या सहभागाने विविध स्तरांवर प्रचार-प्रसार करण्यात येत असून हिंदूंना सभेला येण्याचे आमंत्रण देण्यात येत आहे.या अंतर्गत मान्यवर व्यक्तींच्या भेटी घेणे,बैठका घेणे,फलक (होर्डिंग)लावणे आदींद्वारे प्रसार चालू आहे.

मान्यवर व्यक्तींना सभेचे निमंत्रण

सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले,सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर,उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर,नगरसेवक,नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयवंत जावडेकर,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.रेश्मा सावंत,जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण सभापती सौ.पल्लवी राऊळ यांची भेट घेऊन सभेचे निमंत्रण देण्यात आले.

मी या सभेला एक श्रोता म्हणून नक्की उपस्थित रहाणार.मला तुमचे कार्य ठाऊक आहे.  – जयवंत जावडेकर,मुख्याधिकारी

आमचे तुम्हाला नेहमीच सहकार्य असते.मी सभेला नक्की येणार आहे. – श्री.बबन साळगावकर,नगराध्यक्ष

स्थळ : सावंतवाडी शहरातील जिमखाना नजिकचे पटांगण

वार : रविवार,२० जानेवारी २०१९

वेळ : दुपारी ४.३०

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now