परात्पर गुरुदेवांप्रमाणे सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता येऊन त्यांची आई होण्याचे ध्येय ठेवणार्‍या मायासम नाहस !

मायासम नाहस

‘परात्पर गुरुदेव, आपणच माझे माता-पिता आहात ! ‘माझ्या संपूर्ण आयुष्यात एखाद्या लहान मुलासारखी माझी कुणीतरी काळजी घ्यावी’, असे मला पूर्वी वाटत होते; मात्र ‘एके दिवशी मलाच आजूबाजूच्या सर्वांचे आई-वडील म्हणून वागायचे आहे’, याची मला आता जाणीव झाली आहे. या जन्मात तुम्ही मला दिलेला माझा मुलगाच नव्हे, तर जगातील प्रत्येक व्यक्तीवर मला आईसारखे प्रेम करता येऊ दे. मला ठाऊक आहे, ‘ही एक अत्यंत उच्च संकल्पना आहे’; परंतु ती जीवनातील अंतिम संकल्पना आणि उद्दिष्टांपैकी एक आहे. संपूर्ण मनुष्यजातीवर तुम्ही अपार प्रीती (निरपेक्ष प्रेम) करता. तुमच्याप्रमाणेच हा टप्पा गाठेपर्यंत मलाही पृथ्वीवरील प्रत्येक जिवावर शुद्ध, सात्त्विक आणि मातृवत् प्रेम करता येणे आवश्यक आहे.

गुरुदेव, हे सर्व मला आतून तीव्रतेने वाटत आहे. या सर्व गोष्टी मी तुमच्याकडून ऐकलेल्या आहेत, तसेच साधकांनीही यापूर्वी या सांगितलेल्या आहेत; पण आता मी ते प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे त्यातील सत्यता मला पटली आहे. हे सर्व बोलणे सोपे आहे; परंतु तुमच्या कृपेविना या सर्व गोष्टी साध्य करणे मला अशक्य आहे.

मी आपल्या पवित्र चरणांशी शरण आले आहे. ‘एक ना एक दिवस खर्‍या अर्थाने सर्वांची आई होण्याची माझी योग्यता आहे कि नाही ?’, हे केवळ आपणच ठरवू शकता. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे मला या प्रसारदौर्‍यातून शिकायला मिळालेली सूत्रे कठोर प्रयत्न करून सत्यात उतरवीन आणि ते प्रयत्न आपण पहाल, त्या वेळी मला आपले आशीर्वाद मिळतील आणि मी आपल्यात एकरूप होऊन जाईन.’

– मायासम नाहस, (नोव्हेंबर २०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now