गैरव्यवहारामुळे महाराष्ट्रात यंदा चारा छावण्या रहित !

भ्रष्टाचारापुढे हतबल झालेले नव्हे, तर गैरव्यवहार करणार्‍यावर कडक कारवाई करणारे शासन मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

मुंबई – यापूर्वी चारा छावण्यांमध्ये अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्याने या वर्षी चारा छावण्या न उघडता केवळ भाकड जनावरांची गोशाळांमध्ये पाठवणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठवाड्यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. या भागातील संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना इत्यादी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर गोशाळांमध्ये जनावरांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात यापूर्वी जेव्हा दुष्काळी स्थिती निर्माण झाली, तेव्हा जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात आल्या; परंतु त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या त्या वेळी तक्रारी आल्या होत्या. यंदा राज्यातील २६ जिल्ह्यांतील १५१ तालुके, २६८ मंडळे आणि ९३१ गावे यांमध्ये अशा प्रकारे तीन टप्प्यांत दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये अनुमाने १ कोटी ३२ लाख जनावरांची संख्या आहे. त्यासाठी ८० ते ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यंदा चारा छावण्या न चालू करता जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर रहाणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now