याकूब मेमनच्या मुलीच्या निकाहाला दाऊदचे नातेवाईक उपस्थित !

राष्ट्रद्रोही आतंकवाद्यांच्या मुलांच्या लग्नांचे मोठे सोहळे मुंबईत होतात आणि त्यांच्या लग्नाला मोठ्या प्रमाणात नातेवाईक अन् लोक येतात; मात्र ते आतंकवादी फरार असतात. राष्ट्रद्रोही आतंकवाद्यांना पकडण्यात सरकारची इच्छाशक्ती अल्प पडते का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जुबैदा

मुंबई – १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेल्या याकूब मेमनची मुलगी जुबैदा हिचा याच प्रकरणातील फरार आरोपी अझीझ बिखालिया याचा मुलगा अफजल याच्यासमवेत ११ जानेवारीला माहीम येथे निकाह झाला. या वेळी आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिमचे काही नातेवाईक उपस्थित होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

गुजरातमार्गे पाकिस्तानातून आलेला सर्व शस्त्रसाठा बिखालियाने अबू सालेम, सलीम हिंगोरा, बाबा मुसा यांच्यापर्यंत पोहोचवला होता आणि नंतर तो संजय दत्तच्या घरी ठेवण्यात आला होता. बिखालिया हा दाऊद इब्राहिमसाठी ३० वर्षांहून अधिक काळ काम करत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now