स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न चालू ! – महापालिका आयुक्त

आयुक्त रवींद्र खेबुडकर

सांगली, १२ जानेवारी (वार्ता.) – शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छतागृह दुरुस्ती, रिक्शा घंटागाड्या, झोपडपट्टया स्वच्छता या गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत. पुढील आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षणासाठी विशेष पथक सांगलीत दाखल होणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी ११ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

आयुक्त म्हणाले…

१. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिका आघाडीवर होती. याही वेळी स्पर्धेत भाग घेतला आहे. या अभियानासाठी शहरातील सार्वजनिक भिंती रंगवण्याचे काम चालू आहे.

२. आठवडा बाजारातील कचरा जागीच निर्गतीकरण करण्यासाठी नवीन ‘सेडर्स’ यंत्रातून भाज्या तोडल्या जाणार आहेत. आठवडा बाजारातील विक्रेत्यांना भाजीपाल्याची विक्री झाल्यानंतर एका पोत्यात उरलेला कचरा भरून ठेवण्यास सांगितले आहे. यापुढे याची कार्यवाही न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

३. स्थायी समितीच्या सभेत ४० रिक्शा घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. १५ जानेवारीनंतर झारखंडहून या गाड्या सांगलीत दाखल होतील.

४. ‘स्वच्छता अ‍ॅप’ नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. याद्वारे नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निवारण २४ घंट्यांत गेले जाणार आहे. गतवर्षी १७ सहस्र नागरिकांनी हे ‘अ‍ॅप’ ‘डाऊनलोड’ केले. यंदा ५५ सहस्र नागरिकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now