बेंगळूरू येथील ‘वर से इनोव्हेशन प्रा.लि.’ आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा प्रविष्ट

‘डेली हंट’ अ‍ॅपवरून संशयित आरोपीच्या छायाचित्राऐवजी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे छायाचित्र प्रसारित केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा) – ‘डेली हंट’ या भ्रमणभाष अ‍ॅपवरून ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी ‘गौरी लंकेश हत्याप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी’ या मथळ्याखालील वृत्तात अमोल काळे यांचे छायाचित्र प्रसारित करण्याऐवजी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे छायाचित्र प्रसारित करून त्यांची अपकीर्ती केली होती. त्यामुळे श्री. रमेश शिंदे यांची नाहक अपकीर्ती झाल्याने त्यांनी या प्रकरणी बेंगळूरू (कर्नाटक) येथील या अ‍ॅपचे मालक असलेले ‘वर से इनोव्हेशन प्रा.लि.’ आस्थापन आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र गुप्ता यांच्या विरोधात ५० लाख रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

श्री. शिंदे यांनी उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २२ सप्टेंबर २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून उपरोक्त व्यक्तींकडून ५० लाख रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. रमेश शिंदे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश जोशी (ताकभाते), कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत ‘वर से इनोव्हेशन प्रा.लि.’ आस्थापन अन् तिचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र गुप्ता यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now