हिंदु धर्मीय तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

पुढील आठवड्यात करणार अधिकृत घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची वर्ष २०२० मध्ये होणारी निवडणूक लढण्यासाठी मी सिद्ध असून याविषयी पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा करणार आहे, अशी माहिती अमेरिका येथील ३७ वर्षीय प्रसिद्ध हिंदु धर्मीय खासदार तुलसी गबार्ड यांनी दिली. त्या येथे ‘सीएन्एन्’ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. त्या डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. गबार्ड निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या सर्वांत तरुण राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार्‍या त्या पहिल्या हिंदु उमेदवार आहेत. हिंदु म्हणून अमेरिकेच्या सार्वभौम संसदेच्या अधिकृत सदस्या बनण्याचा मानही गबार्ड यांना मिळाला आहे. त्या वर्ष २०१२ आणि २०१६ असे सलग २ वेळा हवाई प्रांतातून खासदार म्हणून निवडून गेेल्या आहेत. अमेरिकन संसदेत भगवद्गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार्‍या त्या पहिला आणि एकमेव खासदार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF