राममंदिर उभारण्यासाठी चालू केलेल्या ‘रामनाम गजर’ अभियानावर मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अज्ञानमूलक टीका !

कोणत्याही कार्याच्या यशस्वितेसाठी आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता असते. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आतापर्यंत अध्यात्म, साधना यांकडे दुर्लक्ष केल्यानेच आज केवळ राममंदिराच्या स्थापनेसाठी नाही, तर अन्य अनेक आघातांच्या विरोधात हिंदूंना लढावे लागत आहे !

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले राममंदिर अयोध्येमध्ये लवकरात लवकर उभारण्यात यावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘रामनाम गजर’ अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणची मंदिरे, तसेच मठ या ठिकाणी नामजप करण्यात आला. या उपक्रमावर एका जिल्ह्यातील एका गावातील मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्याकडून अज्ञानमूलक टीका करण्यात आली. त्या गावातील हिंदुत्वनिष्ठांच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या गटात समितीच्या कार्यकर्त्याने स्थानिक उपक्रमाची ‘पोस्ट’ करून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यावर एका कार्यकर्त्याने ‘इकडे राममंदिराच्या खटल्यावर तारखावर तारखा पडत आहेत आणि हिंदु समाज अजूनही रामनामाच्या जपाचा संकल्प करत बसला आहे’, अशी प्रतिक्रिया गटात टाकली, तसेच त्या दिवशी त्या गावामध्ये उपक्रम पार पडल्यानंतर मोठ्या संघटनेच्या एका कार्यकर्त्याने माहिती काढण्याच्या उद्देशाने ‘कार्यक्रम कधी संपला ? उपस्थिती किती होती ?’, अशी चौकशीही केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now