महापौर निवडणुकीत भाजपला मतदान करणारे राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक बडतर्फ !

नगर – येथील महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना अध्यक्षपदावरून काढण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. नगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश दिलेला असतांना तो डावलण्यात आल्याचा आरोप आहे.


Multi Language |Offline reading | PDF