रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात युरोपमधील श्री. बोयान बाल्याक यांना झालेले त्रास

१. ‘श्रीयंत्र पूजा’ आणि ‘श्री छिन्नमस्तादेवी’चा याग या वेळी झालेले त्रास

श्री. बोयान बाल्याक

‘सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात ३०.१२.२०१८ या दिवशी ‘श्रीयंत्र पूजा’ आणि ३१.१२.२०१८ या दिवशी ‘श्री छिन्नमस्तादेवी’चा याग करण्यात आला. या दोन्ही वेळी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास झाला.

अ. ‘सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात ३०.१२.२०१८ या दिवशी झालेल्या ‘श्रीयंत्र पूजेच्या वेळी मला त्रास देणारी वाईट शक्तीचा त्रास वाढला होता. ती सूक्ष्मातून एका संतांना स्वतःसमवेत नाच करण्यासाठी बोलावत होती, तसेच ‘ संतांना नाचता येते का ?’, याविषयी चिंता व्यक्त करत होती.

आ. ३१.१२.२०१८ या दिवशी झालेल्या ‘श्री छिन्नमस्तादेवी’च्या यागाच्या वेळी मला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीचा त्रास वाढला होता. ती तिचे डोके हळुवारपणे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फिरवत होती, जणू काही ती संपूर्ण जागा ‘स्कॅन’ करत असल्याप्रमाणे निरीक्षण करत होती. असे काही वेळ चालू होते. ती वाईट शक्ती तिच्या डोळ्यांतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करत होती. हे कृत्य ती जाणीवपूर्वक आणि निर्भयपणे करत होती. ही अनुभूती मला रात्री ११.४५ ते १२ या कालावधीत आली.’

२. सूक्ष्मातील प्रयोग करण्यासाठी एका संतांच्या खोलीत गेल्यावर तेथे त्यांचे आगमन झाल्यावर भीती वाटणे, ‘आपण मूर्च्छित होऊ’, असे वाटणे, संतांनी प्रश्‍न विचारण्याविषयी कठोरपणे विचारल्यावर मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार येणे आणि ‘ते आपल्याला संबोधत नसून वाईट शक्तीला संबोधत असल्याचे नंतर लक्षात येणे

३०.१२.२०१८ या दिवशी आम्ही काही साधक सूक्ष्मातील प्रयोग करण्यासाठी एका संतांच्या खोलीत गेलो होतो. त्या वेळी मला अस्वस्थ वाटत होते. थोड्या वेळाने तेथे संत आले. तेव्हा मला फार भीती वाटली आणि काही क्षणांनंतर ‘मी मूर्च्छित होईन’, असे मला वाटले. इतर साधक संतांशी सूक्ष्मातील प्रयोगाविषयी बोलत होते. मी मात्र शांत होतो. नंतर त्यांनी कठोरपणे मला विचारले, ‘‘तुम्हाला काही विचारायचे आहे का ?’’ त्या वेळी ‘मी शिकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे संत माझ्याशी कठोरपणे बोलत आहेत’, असे मला वाटले; मात्र ‘ते मला संबोधत नसून मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला संबोधत होते’, हे माझ्या नंतर लक्षात आले.’

– श्री. बोयान बाल्याक, क्रोएशिया, युरोप. (३१.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF