‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर संगीताचा कोणता परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी केलेल्या प्रयोगाच्या वेळी ‘सेक्सोफोन’ हे वाद्य वाजवले जात असतांना साधिकेला झालेले त्रास !

इव्होन प्रेगेंझर

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने अभ्यास म्हणून ‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर संगीताचा कोणता परिणाम होतो ?’, याविषयी प्रयोग घेण्यात आला. ४.१.२०१९ या दिवशी झालेल्या प्रयोगाला मी प्रथमच गेले होते. या प्रयोगात एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. फ्रान्सिस्कस बुडाआजी यांनी ‘सेक्सोफोन’ हे वाद्य वाजवले. त्या वेळी वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांचा त्रास वाढला. ते विचित्रपणे वागू लागले. तेव्हा मला पुष्कळ अस्वस्थ वाटून माझी डोकेदुखी तीव्र झाली आणि मला पुष्कळ थकवाही जाणवू लागला. ‘तेथून निघून जावे’, असे मला वाटत होते.’

– सौ. इव्होन प्रेगेंझर, ऑस्ट्रिया (४.१.२०१९)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now