कुंभनगरी प्रयागराज येथे हुतात्मा सैनिकांना शतकुंडी महायज्ञाद्वारे देण्यात येणार श्रद्धांजली !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज (कुंभनगरी), ११ जानेवारी – येथे हुतात्मा सैनिकांना शतकुंडी महायज्ञाद्वारे श्रद्धांजली देण्यात येणार आहे. कुंभमेळ्यातील सेक्टर १४ च्या हरिश्‍चंद्र मार्गाच्या ठिकाणी असलेल्या देहराडून येथील ‘अति विष्णु महायज्ञ सेवा समिती’च्या शिबिरामध्ये या महायज्ञाची सिद्धता चालू आहे. या यज्ञशाळेमध्ये १० हवनकुंड सिद्ध करण्यात येणार आहेत. समितीचे संचालक संत श्री बालयोगेश्‍वरदास महाराज त्यांच्या उपस्थितीत हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य नागरिक या हवन कुंडामध्ये आहुती देणार आहेत. या शिबिरामध्ये हुतात्मा सैनिकांच्या सन्मानासाठी प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. प्रदर्शनाचा मुख्य हेतू हुतात्मा सैनिकांची गौरवगाथा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हा आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now