५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील कु. अनुज जयंत करोडदेव (वय १६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अनुज करोडदेव आणि चि. स्वराज सोनार हे आहेत !

कु. अनुज करोडदेव

(वर्ष २०१६ मध्ये कु. अनुजची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती. – संकलक)

‘पौष शुक्ल पक्ष सप्तमी (१३.१.२०१९) या दिवशी कु. अनुज जयंत करोडदेव याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अनुज जयंत करोडदेव यास सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. कु. अनुजची रहाणी अगदी साधी आणि नीटनेटकी आहे. त्याला कुणाकडूनही अपेक्षा नसते.

२. दुसर्‍यांना साहाय्य करणे

अ. तो नेहमी घरातील कामात साहाय्य करतो, उदा. झाडणे, पुसणे, अन्य स्वच्छता करणे इत्यादी. तो सर्व ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने करतो.

आ. तो साधकांना संगणकीय सेवेमध्येही साहाय्य करतो. तो कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाही.

३. प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे

अ. तो बोलण्यातून सर्वांना आपलेसे करतो.

आ. तो प्रत्येकाची काळजी घेतो. ‘कुणाला काही त्रास होऊ नये’, असा त्याचा विचार असतो. एखादे वेळी मला बरं वाटत नसेल, तर तो सर्वांना ‘शांत रहा. आवाज करू नका’, असे सांगतो.

४. समाजातील व्यक्ती त्याला पाहून आकर्षिल्या जाणे

एकदा यवतमाळचे श्री. दाभाडकरकाका यांना ठीक वाटत नव्हते. त्यामुळे तो त्यांना घेऊन रुग्णालयात गेला असता तेथे असलेली एक व्यक्ती अनुजकडे पाहून काकांना म्हणाली, ‘‘तुमचा मुलगा वेगळा वाटतो. त्याच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर आपण त्याच्याकडे ओढले जातो.’’ तो शाळेतही सर्व शिक्षकांचा पुष्कळ आवडता विद्यार्थी आहे.

५. कर्तेपणा नसणे

त्याला दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळाले; म्हणून सर्वजण त्याचे अभिनंदन करत होते. त्या वेळी तो स्थिर राहून म्हणाला, ‘‘ही सर्व माया आहे.’’

‘देवा, तूच हे सर्व लिहून घेतले. मला तू दोन दैवी बालके दिलीस. तूच माझ्याकडून साधना करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’’

– सौ. सोनल जयंत करोडदेव (अनुजची आई), यवतमाळ (१.१०.२०१८)

 

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नंदुरबार येथील चि. स्वराज सोनार (वय १ वर्ष) !

चि. स्वराज सोनार

पौष शुक्ल पक्ष षष्ठी (१२.१.२०१९) या दिवशी चि. स्वराज सोनार याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नंदुरबार येथील स्वराजची आजी सौ. छाया सोनार, आई सौ. वर्षा सोनार आणि मावशी कु. दीपाली सोनार यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

प्रथम वाढदिवसानिमित्त चि. स्वराज सोनार याला सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गरोदरपण

१ अ. गर्भधारणा – आधुनिक वैद्यांचे उपचार घेऊनही गर्भधारणा न होणे आणि दत्ताचा नामजप केल्यावर गरोदर रहाणे : ‘मी गरोदर रहाण्यासाठी आधुनिक वैद्यांचे उपचार घेत होते; पण मला त्याचा विशेष उपयोग झाला नाही. माझ्या आईने दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका साधिकेच्या उदाहरणावरून मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगितला. हा नामजप नियमित एक घंटा केल्यानंतर बरोबर २ मासांनी मी गरोदर राहिले.

१ आ.‘दत्तबावन्नी’ ऐकल्यावर, तसेच साधक घरी आल्यावर बाळाची हालचाल वाढणे : गरोदरपणात मी ‘दत्तबावन्नी’ नियमित ऐकत असे. तेव्हा ‘गर्भातील बाळाची हालचाल अधिक गतीने होत आहे’, असे मला जाणवायचे. साधक घरी आल्यानंतरही असेच जाणवायचे. त्यामुळे  ‘जणू साधक बाळाला भेटायलाच आले आहेत’, असे मला वाटायचे.

१ इ. उच्च आध्यात्मिक पातळीचे साधक आल्यानंतर दिवसभर न जाणवलेली बाळाची हालचाल जाणवू लागणे : एके दिवशी सकाळपासून एकदाही मला बाळाची हालचाल जाणवली नव्हती. त्या दिवशी सायंकाळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले एक साधक अकस्मात आमच्या घरी आले आणि त्या वेळी बाळाची हालचाल अधिक तीव्र गतीने झाल्याचे जाणवले.’ – सौ. वर्षा सोनार

१ ई. ‘सातव्या मासात ताई माहेरी आली होती. तेव्हा तिच्या पोटावर दैनिक सनातन प्रभात ठेवला असता बाळाची हालचाल अधिक प्रमाणात जाणवायची.

१ उ. ताईला गोड आणि सात्त्विक भोजन आवडणे : त्या काळात ताईला गोड आणि सात्त्विक भोजन पुष्कळ आवडत असे. त्या वेळी असे वाटायचे, ‘जणू काही बाळालाच गोड आणि सात्त्विक पदार्थ आवडत आहेत.’ – कु. दीपाली सोनार

२. जन्मानंतर

२ अ. हसतमुख आणि तेजस्वी : ‘बाळाला प्रसुतीगृहातून बाहेर आणल्यानंतर ते ‘हसतमुख आणि तेजस्वी’ दिसत होते. त्याच्याकडे पहातांना काहीतरी वेगळेपण जाणवत होते.’ – सौ. छाया सोनार

२ आ. शांत आणि आनंदी : ‘जन्मल्यानंतर बाळ पुढील उपचारांसाठी ५ दिवस दुसर्‍या रुग्णालयात होते. आईपासून दूर राहूनही ते शांत आणि आनंदी असल्याचे जाणवायचे.’ – कु. दीपाली सोनार

२ इ. मांडीवर बसून शांत चित्ताने भावसत्संग ऐकणे : ‘एकदा माझी आई भावसत्संग ऐकत असतांना २ – ३ मासांच्या स्वराजला मांडीवर घेऊन बसली होती. तेव्हा त्याने न झोपता आणि न रडता शांत चित्ताने भावसत्संग ऐकला.

२ ई. मी रुग्णाईत असतांना स्वराज शांत असतो अन् मला समजून घेतो.

२ उ. सात्त्विकतेची आवड

१. स्वराज रडत असतांना किंवा चिडचिड करत असतांना त्याच्या कानात नामजप केल्यास तो लगेच शांत होतो.

२. अनोळखी व्यक्तींकडे न जाणारा स्वराज साधकांकडे मात्र लगेच जातो.

३. तो ७ मासांचा असल्यापासून भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या प्रतिमांकडे झेप घेतो.

४. संत भक्तराज महाराज यांची भजने आणि श्रीकृष्णाची भावगीते ऐकल्यावर तो लगेच झोपतो.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ त्याला पुष्कळ आवडतो.

२ ऊ. त्याच्या शरिरावर दैवी कण आढळतात.

‘हे भगवान श्रीकृष्णा, हे परात्पर गुरुदेवा, आज केवळ तुमच्या कृपेमुळेच मी स्वराजची गुणवैशिष्ट्ये लिहू शकले. त्यासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– सौ. वर्षा सोनार (२३.१२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now