हिंदूंना अनाठायी भीती दाखवू नये !

धर्मप्रसारासाठी गेल्यावर काही गोष्टी अनुभवण्यास येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या सरकारविषयी बोलण्याचे सूत्र आहे. बाहेर अनेक जण असे मत व्यक्त करतात की, सरकार विरुद्ध बोललो, तर काँग्रेस सत्तेवर येईल आणि मग हिंदूंना अनेक त्रास भोगायला लागतील. ‘मोदी आहेत म्हणून हिंदूंची धडगत आहे; अन्यथा हिंदूंना कठीण काळ भोगायला लागेल’, अशीही काहींची विचारप्रक्रिया दिसून येते. याविषयी काही सूत्रे लक्षात येतात. आपल्या भारत देशाने गेल्या सहस्रो वर्षांत अनेक राक्षसी वृत्तीच्या सुलतानांची राज्य अनुभवलेली आहेत. अकबर, शहाजहान, औरंगजेब असे अनेक राक्षसी सुलतान हिंदूंनी पाहिलेले आहेत. नंतर इंग्रजांची जुलमी राजवट हिंदूंनी अनुभवली; पण हिंदूंचा तेजस्वी इतिहास असा आहे की, प्रत्येक काळात हिंदूंचे नेतृत्व हिंदु राजांनी सक्षमपणे केले आहे. उदा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे इत्यादी. या सर्वांनी असे कर्तृत्व गाजवले की, शत्रूला पळता भुई थोडी झाली होती. इंग्रजांच्या वेळी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या निर्भयी नेत्यांनी नेतृत्व केल्याने आणि क्रांतीकारकांनी दिलेल्या लढ्यामुळे इंग्रजांना देश सोडून पळून जावे लागले. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हा इतिहास विसरू नये. ‘मोदींची सत्ता गेल्यावर हिंदूंचे कसे होईल’, अशी भीती दाखवू नये अथवा बाळगू नये, असे वाटते. तसेच सरकारनेही हिंदूंसाठी असे कोणते भरीव कार्य केले आहे,

ज्यामुळे हिंदूंना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान जोपासला जात आहे, असे वाटेल, असेही उदाहरण नाही. सर्व पक्षांनी हिंदूंची फसवणूक केल्याचे आता हिंदूंना हळूहळू लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे एखादे हिंदूंचे सक्षम असे नेतृत्व सामान्यांतून उभे राहील आणि परत एकदा शत्रूला अशी शिक्षा करील की, त्यांनासुद्धा पळता भुई थोडी होईल.

हिंदु जनजागृती समिती ज्या पद्धतीने हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी सभा घेत आहे, गावागावांत जाऊन जनजागृती करत आहे, लोकांना धर्माविषयी, हिंदूंच्या समस्यांविषयी अवगत करत आहे. त्यातूनच हे नेतृत्व उभे राहील, हे निश्‍चित वाटते. त्या वेळी तरी मोठ्या म्हणवणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांची चूक लक्षात येईल का ?, असा प्रश्‍न आहे.

– श्री. पराग गोखले, पुणे.


Multi Language |Offline reading | PDF