गोरक्षणासाठी आपण आणि पूर्वजांनी काय केले ?

राजकीय नेत्यांना राहुल बजाज यांचा प्रश्‍न

गोरक्षणासाठी जिवाचे रान करणार्‍या गोरक्षकांवर चिखलफेक करण्यापलीकडे राजकीय नेत्यांनी काहीही केलेले नाही, हे वास्तव आहे !

मुंबई – गायींचे रक्षण करण्यासाठी आपल्या वडिलांनी किंवा पूर्वजांनी काय केले ?, ते राजकीय नेत्यांना प्रत्येकाने विचारले पाहिजे. माझे आजोबा म्हणजे जमनालाल बजाज हे झोपडीमध्ये रहात होते आणि स्वत: गायींना अंघोळ घालत होते; मात्र सध्या आपण गायींसाठी जमावाकडून हत्या करत आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी केले. आजी जानकीदेवी बजाज यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी ते येथे बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF