सिंधुदुर्ग जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

वेंगुर्ले येथे सहभागी झालेले प.पू. कलावतीआई संप्रदायाचे साधक

कुडाळ – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असल्याचे पुरातत्व खात्याच्या पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. असे असतांनाही गेली कित्येक वर्षे या ठिकाणी राममंदिर बांधण्याचे प्रलंबित आहे. जगभरातील मुसलमान मक्का-मदिना, तर ख्रिस्ती जेरुसलेमला जातात; मात्र जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली रामजन्मभूमी येथे साधी पूजाही करता येत नाही. गेली अनेक वर्षे प्रभु श्रीराम येथे कापडी तंबूत रहात आहेत. ही प्रभु श्रीरामचंद्र यांची विटंबना आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेलाही याविषयी महत्त्व वाटत नाही, असे वाटते. त्यामुळे आता प्रभु श्रीराम यांच्या चरणीच राममंदिराच्या बांधकामात येणारे अडथळे दूर व्हावेत, केंद्र सरकारला राममंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी बळ मिळावे, न्यायालयातील संबंधित न्यायाधिशांना या प्रकरणी शीघ्रतेने निर्णय घेता यावेत, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी मंदिरांत रामनामाचा जप करून श्रीरामाच्या चरणी प्रार्थना (साकडे) करण्यात आली.

कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात नामजप करतांना धर्माभिमानी हिंदू

कणकवली – तालुक्यातील शिवडाव येथील श्री साई मंदिरात १० जानेवारी या दिवशी सायंकाळी सामूहिक रामनाम जप करण्यात आला. या वेळी सनातनच्या सौ. माधुरी ढवण यांनी उपस्थितांना रामनामाच्या जपाविषयी माहिती दिली. तरंदळे येथील श्री. संभाजी घाडीगावकर यांच्या घरी, घोणसरी येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दारिस्ते गावकरवाडी येथेही सामूहिक रामनाम जप करण्यात आला.

कुडाळ – तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात राममंदिरासाठी  सामूहिक साकडे घालून नामजप करण्यात आला. उपस्थितांना रामनामाच्या जपाविषयी  श्री. संजोग साळसकर यांनी माहिती दिली. या वेळी कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्या सौ. प्राजक्ता प्रभु आणि येथील लघुउद्योजक श्री. मनीष धांडे सहभागी झाले होते. कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर येथे सामूहिक नामजप करण्यात आला.

देवगड – तालुक्यातील पडेल येथे९ जानेवारीला श्री गणेश मंदिर (सुतारवाडी), श्री गणेश मंदिर (दडदडेवाडी),श्री भावकादेवी मंदिर; बापर्डे येथील धुरेवाडी येथे धर्मशिक्षणवर्गात रामनामाचा जप करण्यात आला. सुतारवाडीतीलश्री गणेश मंदिर आणि दडदडेवाडीतीलश्री गणेश मंदिर येथे डॉ. रविकांत नारकर यांनी, तर श्री भावकादेवी मंदिरातसौ. ज्योत्स्ना नारकर यांनी उपस्थितांना जपाविषयीची माहिती दिली.

वेंगुर्ले येथील पार्सेकर दत्तमंदिर, श्री हनुमान मंदिर, उभादांडा येथीलश्री केपादेवी मंदिर आणि श्री विठ्ठलमंदिर येथे नामजप करण्यात आला.येथील सामूहिक नामजपात प.पू. कलावती आई संप्रदायाच्या साधकांनी सहभाग घेतला होता. या सर्व ठिकाणी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदू यांनी सहभाग घेतला होता.


Multi Language |Offline reading | PDF