सानपाडा येथे राममंदिरासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांचे विचार

राममंदिर बांधण्याचा अध्यादेश न काढल्यास आमच्याकडे पर्याय आहे, हे पंतप्रधानांनी लक्षात घ्यावे ! – मिलिंद सूर्यराव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आम्ही हिंदूंनी नरेंद्र मोदी यांना एक हाती सत्ता दिली; परंतु आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. आम्ही मोदींना चेतावणी देतो की, राममंदिर बांधण्याचा अध्यादेश काढला नाही, तर आमच्याकडे पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला राममंदिरासाठी अध्यादेश काढावाच लागेल. आज तुम्ही जी न्यायालयाची भाषा करत आहात, ती निवडणुकीच्या वेळी केली असती, तर आम्ही तुम्हाला पंतप्रधान होऊ दिले नसते.

हिंदूंना वाली कोण आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे ! – डॉ. ममता देसाई

जे सरकार राममंदिर बांधण्याच्या आश्‍वासनावर निवडून आले आहे, त्यांनाच आज मंदिर बांधण्याचा विसर पडला आहे. राममंदिराविषयी शासनाला खडसावण्याची वेळ आली आहे. न्यायव्यवस्थेलाही राममंदिर प्राधान्याचे वाटत नाही. यावरून आता हिंदूंना वाली कोण आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. यासाठी आपण संघटित झाले पाहिजे.

हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे ! – गिरीश गुप्ता, हिंदुत्वनिष्ठ

एका सभेत काँग्रेस कार्यकर्ता ‘भारतमाता की जय’ म्हणायला लागला, तेव्हा त्याला रोखले गेले आणि प्रथम ‘सोनिया गांधीकी जय’ म्हणायला लावले. भारतापेक्षा सोनिया गांधी मोठ्या आहे का ? हेच काँगे्रसवाले राम काल्पनिक आहे, अयोध्येत राममंदिर नव्हते, असे म्हणतात. आता हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.

उपस्थित मान्यवर : शिवसेना विभाग प्रमुख श्री. घनश्याम पाटे, आगरी-कोळी ब्रेन प्रमुख मंगेश म्हात्रे, खारघर शिवसेना शहरप्रमुख गिरीश गुप्ता, समाजसेवक गणपत वाफारे, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी


Multi Language |Offline reading | PDF