अयोध्येत भव्य राममंदिर झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – राज वर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

नालासोपारा येथील नामदिंडीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग !

धर्मध्वजाचे पूजन करतांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या

नालासोपारा, ११ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत राममंदिर व्हावे, यासाठी देशात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. आमच्या पूर्वजांनी बांधलेले राममंदिर आक्रमकांनी तोडले. हा देश हिंदूंचा आहे. राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. अयोध्येत भव्य राममंदिर झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा उद्घोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राज वर्मा यांनी नालासोपारा येथील नामदिंडीमध्ये केला. अयोध्येमध्ये भव्य राममंदिर व्हावे, या मागणीसाठी नालासोपारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या नामदिंडीच्या समारोपाप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित करतांना वरील उद्गार काढले.

या नामदिंडीमध्ये परशुराम सेना, हिंदू युवा वाहिनी, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. येथील पंचमारुति मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या दिंडीची सांगता चक्रेश्‍वर महादेव मंदिराच्या ठिकाणी झाली. तेथे दिंडीचे सभेत रूपांतर झाले. या नामदिंडीसाठी भाजप युवा मोर्चाचे श्री. नीलेश खोकाणी, शिवसैनिक जयेंद्र (भाई) पाटील, रवीकिरण परब यांनी विशेष सहकार्य केले. नामदिंडी चालू असतांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिंडीतील पालखीतील श्रीरामाची मूर्ती आणि धर्मध्वज यांचे पूजन केले. श्रीरामाच्या आरतीने नामदिंडीचा समारोप झाला. यावेळी श्री. मनीष गोराडिया यांचे सहकार्य लाभले.

हिंदुत्वनिष्ठ शासन असूनही राममंदिर उभे होत नाही, हे लाजिरवाणे ! – प्रदीप मिश्रा, जिल्हा संयोजक, हिंदू युवा वाहिनी, पालघर

हिंदुत्वनिष्ठ शासन सत्तेत असूनही अयोध्येत प्रभु श्रीराम तंबूमध्ये रहातात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे आता सहन होत नाही. आता हिंदू जागृत होत आहेत. वर्ष २०१९ संपण्यापूर्वी सरकारने अयोध्येमध्ये भव्य राममंदिराची उभारणी करावी.

हिंदू म्हणून एकत्र येऊन राममंदिराचा लढा यशस्वी करूया ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

न्यायालयाला समलैंगिक, शबरीमला, नक्षलवाद्यांचे समर्थक यांच्यासाठी वेळ आहे; मात्र १०० कोटी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राममंदिरासाठी वेळ नाही. आम्ही न्यायालयाचा आदर करतो; मात्र न्यायालयाचा हा वेळकाढूपणा म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान आहे. बाबर नव्हे, तर प्रभु श्रीराम आपला आदर्श असायला हवा; मात्र राज्यकर्त्यांच्या डोक्यावर अजूनही बाबरचे भूत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदू म्हणून संघटित होऊन राममंदिराचा लढा यशस्वी करूया.

श्रीरामाचे दूत होऊन राममंदिर उभारणीचे कार्य पूर्णत्वास नेऊया ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

अयोध्येमध्ये राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंनी राजकीय पक्षांवर विश्‍वास ठेवला; मात्र सर्वांनीच निराशा केली. सर्वच राजकीय पक्ष धर्मांधांचे लांगूलचालन करण्यात मग्न आहेत. निधर्मी लोकशाहीमुळे अजूनपर्यंत राममंदिर उभे राहिले नाही. त्यामुळे आता श्रीरामाचे दूत होऊन राममंदिर उभारणीचे कार्य पूर्णत्वास नेऊया.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now