‘गूगल’वर ‘वाईट मुख्यमंत्री’ असा शोध घेतल्यास येते केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव !

शबरीमला प्रकरणी हिंदूंच्या धार्मिक परंपरांचा अवमान केल्याचा परिणाम !

नवी देहली – ‘गूगल’ या जगप्रसिद्ध ‘सर्च इंजिन’वर ‘वाईट मुख्यमंत्री’ (‘बॅड चिफ मिनिस्टर’), असा शोध घेतल्यास केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांचे नाव येत असल्याचे नुकतेच दिसून आले. ‘वाईट मुख्यमंत्री’ असे ‘सर्च’ केल्यास थेट विजयन् यांची माहिती असलेल्या ‘विकिपिडीया’चे पान उघडते. ७ जानेवारी या दिवशी ‘गूगल’वर २० सहस्रांहून अधिक वेळा ‘बॅड चिफ मिनिस्टर’ या ‘किवर्ड्स’नेे ‘सर्च’ करण्यात आले आहे. प्रत्येक वेळी विजयन् यांची माहिती असलेल्या ‘विकीपीडिया’चे पान उघडले.

शबरीमला प्रकरणामुळे विजयन् यांची प्रतिमा चांगलीच डागळली आहे. मंदिरात निषिद्ध वयोगटातील महिलांनी प्रवेश करण्याविषयीच्या त्यांच्या निर्णयाचा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना अद्यापही कडाडून विरोध करत आहेत. नुकतेच शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटातील काही महिलांनी प्रवेश करत भगवान अय्यप्पांचे दर्शन घेत वर्षानुवर्षे चालू असलेली परंपरा मोडीत काढली. यावरून जनतेच्या मनात विजयन् आणि केरळ सरकार यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF