घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे आवश्यक ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत बांधण्याचे पाऊल उचलते, तर भारतात घुसखोरांना रोखणे दूरचेच; पण त्यांना शिधापत्रिका, वाहन परवाना सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतपेढीसाठी वर्षानुवर्षे पोसले जाते !

नवी देहली – अमेरिकेत मानवता आणि सुरक्षा यांवर मोठे संकट आहे. हे संकट मन आणि आत्मा यांवरही आहे. ते परतवून लावण्यासाठी, तसेच घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकेने मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात केले.

ट्रम्प पुढे म्हणाले, ‘‘सीमेवर भिंत बांधण्यासाठी मी ५.७ बिलियन डॉलर (३५ सहस्र कोटी रुपये) देण्यासाठी मी काँग्रेसकडे आग्रह धरला होता. भिंत बांधण्याविषयी जनतेने मला पाठिंबा द्यावा.’’ ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेला ‘शटडाऊन’चा सामना करावा लागत असून ‘शटडाऊन’चा तिसरा आठवडा चालू आहे. ‘डेमोक्रेट्स’नी ट्रम्प यांना निधी देण्यास नकार दिला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now