‘इसिस’मध्ये सहभागी झालेल्या केरळ आणि कर्नाटक राज्यांतील युवकांच्या विरोधात गुन्हा नोंद

वर्ष २०१३ मध्ये माहिती मिळूनही वर्ष २०१९ मध्ये गुन्हा नोंद !

  • इसिसच्या हस्तकांचे समुपदेशन करून त्यांना सोडून देणार्‍या अन्वेषण यंत्रणा हिंदुत्वनिष्ठांना मात्र खोट्या प्रकरणात गोवून त्यांना अटक करतात, हे लक्षात घ्या !
  • गुन्हा नोंदवायला ६ वर्षे लागणार असतील, तर शिक्षा व्हायला किती वेळ लागेल, याचा विचारच न केलेला बरा ! अशाने आतंकवाद्यांना कधी तरी जरब बसेल का ?
  • ‘भारतीय मुसलमानांवर इसिसचा प्रभाव पडणार नाही’, असे छातीठोकपणे सांगणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आता गप्प का ? असे दायित्वशून्य विधान करणार्‍या गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात आतंकवाद फोफावला, तर नवल नाही !

केरळ – कतार येथे इसिस या आतंकवादी संघटनेत सहभागी झालेल्या केरळ आणि कर्नाटक राज्यांतील ७-८ युवकांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) गुन्हा नोंद केला. हे युवक मूळचे केरळ आणि कर्नाटक येथील असून ते कतार येते वास्तव्यास असतात.

इसिसशी संबंधित असलेल्या ‘झुंड-अल्-अक्सा’ आणि ‘जभात-अल्-नुसराह’ या आतंकवादी संघटनांत सहभागी झालेल्या या युवकांची माहिती अन्वेषण यंत्रणेला वर्ष २०१३ मध्येच मिळाली होती. तथापि पुरेशा पुराव्यांअभावी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. कतार येथे गेलेले केरळ आणि कर्नाटक येथील युवक सिरियाच्या विरोधातील युद्धात इसिसच्या बाजूने सहभागी झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF