(म्हणे) ‘भारतीय चित्रपट आणि मालिका यांमुळे पाकच्या संस्कृतीला (?) धोका ! – पाकच्या मुख्य न्यायाधिशांचा दावा

भारतीय चित्रपट आणि मालिका यांच्या प्रक्षेपणास अनुमती नाकारली !

  • कुठे कथित सांस्कृतिक आक्रमण होत असल्याचे सांगून जागरूकता दाखवणारा पाक, तर कुठे आतंकवादी आक्रमणे होऊन त्या विरोधात काहीही न करणारे भारतीय शासनकर्ते !
  • पाकप्रेमी शशी थरूर, मणिशंकर अय्यर आदी आता गप्प का ?
  • पाकिस्तानी कलाकारांना पायघड्या घालणारे आणि त्यांची तळी उचलणारे अभिनेते, अभिनेत्री, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आदींची अशा वेळी दातखिळी कशी बसते ?

इस्लामाबाद – भारतीय चित्रपट आणि मालिका यांमुळे पाकच्या संस्कृतीला (!) धोका आहे, असा दावा पाकचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी केला. यामुळे त्यांनी भारतीय चित्रपट आणि मालिका यांच्या प्रक्षेपणाला अनुमती देण्यास नकार दिला. भारतीय चित्रपट आणि मालिका यांवर असलेल्या बंदीच्या विरोधात ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी’ने सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे मत नोंदवले. या वेळी न्यायालयाने ही बंदी उठवण्यास नकार दिला.


Multi Language |Offline reading | PDF