गुरुकृपेने पुष्कळ दिवसांनी दोनदा गाणे गाण्याची संधी मिळणे आणि त्यासाठी देवानेच प्रसंग घडवल्याचे लक्षात येणे

१. १२ वर्षांनी साधिकेला गाणे गाण्याची संधी मिळणे

‘मी १२ वर्षांपूर्वी संगीत शिकले होते. लग्नानंतर गाणे म्हणण्याचे प्रमाण अल्पच झाले होते. वर्ष २०१७ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे बेळगावच्या एका साधकाला गाणे गाऊन दाखवले.

२. पू. सौरभदादा यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या अनुमतीने गाणे गाण्याची संधी मिळणे आणि देवाला सर्वच गोष्टी ज्ञात असून त्यानेच प्रसंग घडवल्याचे लक्षात येणे

रामनाथी आश्रमात मी शिबिराला आले होते, तेव्हा पू. सौरभदादा यांची भेट झाली. त्यांच्या भेटीसाठी आम्ही १० ते १२ साधक गेलो होतो. त्यांच्या खोलीत जातांना मी ‘मला तेथील चैतन्याचा लाभ करवून घेता येऊ दे’, अशी प्रार्थना करत होते. खोलीत गेल्यावर जोशीकाका (पू. सौरभदादा यांचे वडील) ‘पू. दादांना गाणे आवडते’, याविषयी सांगत होते. त्यांनी विचारले, ‘‘कुणाला गाणे गाता येते का ?’’ मी त्यांना ‘मला येते’, असे सांगितले. नंतर पू. दादांच्या अनुमतीने मी ‘तूच कर्ता आणि करविता । शरण तुला भगवंता ॥’, हे भक्तीगीत म्हटले. ते गात असतांना प्रत्येक ओळीला माझी भावजागृती होत होती. तेव्हा ‘आपण काही करू शकत नसलो, तरी देवाला सर्वच ज्ञात असते आणि तोच प्रसंग निर्माण करतो’, असे मला शिकायला मिळाले.’

– गुरुचरणी कृतज्ञता,

सौ. उज्वला गावडे, बेळगाव, कर्नाटक. (१८.६.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF