श्री. राजीव श्रीवास्तव यांना चारचाकी गाडीच्या मागील आसनावर पू. सौरभदादांचे अस्तित्व जाणवणे आणि पू. सौरभदादांनी त्यांची विचारपूस करून ‘यापुढे सर्व चांगले होईल’, असे सांगणे

पू. सौरभ जोशी

‘३१.८.२०१८ या दिवशी सकाळी माझे मोठे जावई श्री. राजीव श्रीवास्तव चारचाकी गाडीने कु. आनंदिताला (त्यांच्या मुलीला) शाळेत पोहोचवून घरी येत होते. ते गाडीत पुढे बसले होते आणि शेजारी चालक गाडी चालवत होता. श्री. राजीव यांना अचानक ‘गाडीच्या मागील आसनावर पू. सौरभदादा येऊन पहुडले आहेत’, असे जाणवले. श्री. राजीव यांनी त्यांना नमस्कार केला. (श्री. राजीव आमच्यासमवेत दोन वेळा रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांना पू. सौरभदादांचे दर्शन झाले होते.)

पू. सौरभदादांनी श्री. राजीव यांची विचारपूस केली. पू. दादांनी त्यांना विचारले, ‘तुमचे श्रावण मासातील दर्शन आणि पूजन चांगले झाले ना ?’ (जावई श्रावण मासात प्रतिदिन अयोध्येतील भगवान शिवाचे स्वरूप श्री नागेश्‍वरनाथ यांचे दर्शन आणि पूजन करतात.) श्री. राजीव यांनी पू. दादांना सांगितले, ‘दर्शन आणि पूजन उत्तम रीतीने झाले. काही अडचण आली नाही.’ त्या वेळी पू. सौरभदादा त्यांना म्हणाले, ‘फार छान झाले. आता यापुढेही सगळे चांगलेच होईल. काळजीचे काही कारण नाही.’ एवढे बोलून पू. दादा अंतर्धान पावल्याचे जाणवले. (श्री. राजीव यांचा ट्रकचा व्यवसाय होता. वर्ष २०१३ मध्ये त्यांना मज्जासंस्थेचा आजार झाल्यामुळे त्यांचा तो व्यवसाय बंद पडला होता. स्वास्थ्य चांगले झाल्यावर गेली २ वर्षे त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यांची आर्थिक हानी झाली होती.)

श्री. राजीव यांना पू. सौरभदादांचे अस्तित्व अचानक जाणवल्यामुळे पुष्कळ आनंद झाला. घरी परतल्यावर त्यांनी आम्हाला वरील प्रसंग सांगितला. हा प्रसंग सांगत असतांनाही ते पुष्कळ आनंदी, उत्साही आणि चैतन्यमयी दिसत होते.’

– डॉ. नंद किशोर वेद, अयोध्या, उत्तरप्रदेश. (३१.८.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF