पेटवली पंच ज्ञानेंद्रियांची पंचारती ।

साधकांची  आध्यात्मिक उन्नत्ती करूनघेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे

पेटवली पंच ज्ञानेंद्रियांची पंचारती ब्रह्मानंदे घंटा वाजतसे ।

स्मितहास्य करी गुरु जगन्नाथ म्हणे,

कर्ता करविता मीच असे ॥ १ ॥

षडरिपूंचा कापूर पेटविता अहंकाराचा धूर वाहूनी जाई ।

माया-ममता बाह्यांगी दिसती, अंतरी अभंग चालू असे ॥ २ ॥

जैसा समुद्रजली राहूनी गुरुकृपे मत्स्याचा श्‍वास चालू असे ।

तैसे आम्ही बुडालो मायासंसारी,

अंतरी नामश्‍वास चालू असे ॥ ३ ॥

गुरुमाऊलीची महिमा अघटीत अन् अकल्पनीय असे ।

सदा ठेवी गुरुमाऊली तव चरणांसी, हीच प्रार्थना असे ॥ ४ ॥

– श्री. श्रीरामप्रसाद विठ्ठल कुष्टे  (नोव्हेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF