सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सुचवल्यानुसार त्यांच्या माहेरी सांगलीला गेल्यावर सर्वांना २ वर्षांपूर्वी आलेली अनुभूती सांगणे आणि सौ. शैलजा परांजपे यांना मृत मुलाचे स्मरण होऊन ईश्‍वराने साधकाच्या रूपात नवा मुलगा दिल्यामुळे पुष्कळ आनंद होणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

‘मे २०१५ मध्ये परात्पर गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळताईंनी मला सांगितले, ‘‘दादा, तुम्हाला कधी वेळ मिळेल, तेव्हा सांगलीला जाऊन या. आई-बाबांना आनंद होईल !’’ त्याप्रमाणे आम्ही जून २०१५ मध्ये सांगलीला गेलो. त्या वेळी घरी सौ. शैलजा परांजपेआई, श्री. बाबा (सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांचे आई-वडील), सौ. कल्पनाताई आणि सौ. सुवर्णाताई (सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांच्या भगिनी) हे सर्व जण होते. मी त्यांना २ वर्षांपूर्वी मला आलेली अनुभूती सांगितली. तेव्हा आईंच्या (सौ. शैलजा परांजपे यांच्या) डोळ्यांतून अश्रू आले. त्या म्हणाल्या, ‘‘दादा, माझ्या पोटी पहिला मुलगाच जन्मला होता; पण तो फार काळ जगला नाही. ईश्‍वराने तुमच्या रूपात माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.’’ त्या वेळी सर्वांनाच पुष्कळ आनंद झाला. गुरुमाऊलींचे गुणगान चालू होऊन पुष्कळ छान सत्संग झाला. सौ. सुवर्णाताई आणि सौ. कल्पनाताई म्हणाल्या, ‘‘आम्हालाही आध्यात्मिक भाऊ मिळाला.’’ त्या वेळी मला वाटले, ‘ईश्‍वराचे उपकार मानावे तितके अल्पच आहेत. त्याने आपल्या सर्वांना सनातनचे एक छान आध्यात्मिक कुटुंब दिले आहे.’

– श्री. श्रीरामप्रसाद विठ्ठल कुष्टे, ढवळी, फोंडा, गोवा. (डिसेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF