देवीस्वरूप सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना मिळणार्‍या पूर्वसूचना आणि त्याद्वारे देव सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची घेत असलेली काळजी !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक परात्पर गुरुमाऊली संत भक्तराज महाराज, अनंतकोटी ब्रह्मांडनायक परात्पर गुरुदेव, सद्गुरु (सौ.) बिंदाताई, सद्गुरु (सौ.) अंजलीताई, सर्व सद्गुरु, संत, साधक, गुरुबंधू आणि भगिनी यांना या गुरुसेवकाचा शिरसाष्टांग नमस्कार !

माझ्या गेल्या अनेक जन्मांतील भगिनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा २१.१२.२०१८ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या चरणी या वेड्या भावाचा भावपूर्ण शिरसाष्टांग नमस्कार !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. गाडगीळ आणि कुष्टे परिवारांतील सदस्यांचे एकमेकांशी चांगले संबंध निर्माण होणे

वर्ष २००१ मध्ये सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि त्यांची कन्या कु. सायली (आताच्या सौ. सायली करंदीकर) अन् आमची ओळख झाली. सायली आमच्या घरी सौ. पूजाकडे (पत्नीकडे) शिकवणीसाठी येत असे. त्या वेळी सायली ४ – ५ वर्षांची होती. मी मला आलेल्या अनुभूती सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना सांगत असे आणि त्याही त्यांना आलेल्या अनुभूती मला सांगत असत. तेव्हापासून आमच्या दोन्ही कुटुंबांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मला वाटते, ‘सनातनचे साधक म्हणजे एकमेकांचे पूर्वजन्मीचे नातेवाईकच आहेेत. साधकांचा आध्यात्मिक परिवार म्हणजे गोकुळ आणि वैकुंठच आहे.’

श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे

२. सौ. अंजलीताई संतपदावर आरूढ झाल्यावर ‘त्या गेल्या जन्मांतील भगिनी असून भाऊबिजेनिमित्त त्यांची ओटी भरावी’, असा ईश्‍वराकडून संदेश येणे

नोव्हेंबर २०१३ मध्ये नुकतीच दीपावली झाली होती. सौ. अंजलीताई त्या वेळी संतपदावर आरूढ झाल्या होत्या. मला ईश्‍वराकडून संदेश आला, ‘सद्गुरु (सौ.) अंजलीताई तुझ्या गेल्या जन्मांतील भगिनी आहेत आणि त्यांची तुम्ही उभयतांनी (तू आणि तुझी पत्नी सौ. पूजा हिने) माहेरकडून भाऊबिजेनिमित्त ओटी भरायची आहे.’ मी सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना भ्रमणभाष केला. त्या म्हणाल्या, ‘‘मी याविषयी विचारून सांगते.’’ त्याप्रमाणे त्यांनी नंतर मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘ओटी भरायला हरकत नाही.’’ त्या दिवशी संध्याकाळी आम्ही (मी, सौ. पूजा आणि कु. पार्थ) रामनाथी आश्रमात गेलो आणि सौ. पूजाने सद्गुरु (सौ.) अंजलीताईंची ओटी भरली.

३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ दैवी प्रवासासाठी निघत असतांना साधकाला ईश्‍वराकडून पूर्वसूचना मिळणे

सद्गुरु (सौ.) अंजलीताई दैवी प्रवासासाठी निघत असतांना मला गुरुमाऊलीच्या कृपेने ईश्‍वराकडून पूर्वसूचना मिळतात. मार्च २०१५ मध्ये सद्गुरु ताई मदुराई येथे गेल्या होत्या. त्यांची तेथे कुणाशी ओळख नव्हती. तेव्हा ईश्‍वराकडून मला पूर्वसूचना मिळाली, ‘सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना भ्रमणभाष कर’ आणि मी त्यांना भ्रमणभाष केला. माझे तेथील मित्र श्री. बालाजी राव यांनी त्यांची व्यवस्था केली.

नंतर अशी अनुभूती मला पुष्कळ वेळा आली. थोडक्यात म्हणजे ‘सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना आवश्यकता असतांना त्यांच्याच इच्छेने ईश्‍वराकडून मला पूर्वसूचना मिळतात’, असे मला वाटते; कारण त्या स्वतःच देवीस्वरूप आहेत.

अशा देवीस्वरूपी सद्गुरु (सौ.) अंजलीताईंना सर्व साधकांच्या वतीने भावपूर्ण नमस्कार !

सद्गुरु (सौ.) अंजलीताई,

प्रेमळ तू माऊली, राहो सदा तव कृपेची सावली ।

या वेड्या वासराला ठेव तुझ्या छत्रछायेखाली ।’

– गुरुसेवक,

श्री. श्रीरामप्रसाद विठ्ठल कुष्टे, फोंडा, गोवा. (२२.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF