पुणे विद्यापिठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडीमुळे वाद

गोंधळ घालणारे ४ विद्यार्थी कह्यात

पुण्याच्या सांस्कृतिक वारशांपैकी एका घटकाला विरोध करणारे ब्रिटिशांच्या पेहरावाला मात्र विरोध करत नाहीत, हे आश्‍चर्यकारक नव्हे का ? पगडीच्या नावाखाली ब्राह्मणविरोध दर्शवून समाजात दुही माजवण्याचाच हा प्रकार असल्याचे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? वाद निर्माण करणारे असे विद्यार्थी भविष्यात आदर्श समाज कसा घडवणार ?

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदवीदान सोहळ्यात पुणेरी पगडीला विरोध दर्शवत ४ विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या चारही विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून पदवीदान कार्यक्रमासाठी वर्षानुवर्षे असलेला काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’चा पोशाख पालटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पारंपरिक भारतीय पोशाखात येण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले होते. गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा कि फुले पगडीचा, यावरून वाद निर्माण झाला होता. ‘पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या’, अशी मागणी गोंधळ घालणारे विद्यार्थी करत होते.

काही मासांपूर्वी येथील भारती विद्यापिठाच्या पदवीदान समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी ‘घोळदार गाऊन आणि टोपी घालणे, ही ब्रिटीशकालीन पद्धत बंद करणे आवश्यक आहे’, असे सांगितले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही त्याविषयी विचाराधीन होते. अखेरीस विद्यापिठाने पदवीदान कार्यक्रमासाठी पोशाख पालटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुडता, पायजमा आणि उपरणे असा पोशाख ठरवण्यात आला आहे. सोबत पगडीही असेल, असे सांगण्यात आले. मुलींसाठी साडी अथवा पंजाबी पोशाख असे पर्याय होते.

काही विद्यार्थी संघटनांचा पुणेरी पगडीला विरोध आहे. ‘पुणेरी पगडी हे पेशवाईचे प्रतीक असून फुले पगडी हे शिक्षणाचे प्रतीक आहे. पुणेरी पगडीचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडीचा समावेश करण्यात यावा’, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.


Multi Language |Offline reading | PDF