फोंडा (गोवा) येथील पोलिसांकडून १५१ दिवस विलंबाने न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट !

सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर समाजकंटकांनी केलेले जीवघेणे आक्रमण

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसांत संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे २०१८ या दिवशी जीवघेणे आक्रमण केले. या वेळी जमावाने त्यांच्याकडील भ्रमणभाषसंच हिसकावून घेतले, तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड केली. याविषयी श्रीमती पै यांनी शिवराम बांदोडकर, शानू गावडे, रोहिदास गावडे, बाबी गावडे, सविता गावडे आणि रेखा गावडे (सर्व रहाणार बोकडबाग, बांदोडा, फोंडा, गोवा.) यांच्या विरोधात ३० मे २०१८ या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी १ जून २०१८ या दिवशी प्रथमदर्शी अहवाल नोंदवला असूनही अद्यापपर्यंत (१२ जानेवारीपर्यंत) कोणालाही अटक केलेली नाही.

फोंडा पोलिसांनी या घटनेत तक्रार प्रविष्ट होऊन २११ दिवस झाल्यानंतर, म्हणजे २६ नोव्हेंबर २०१८ या दिवशी फोंडा न्यायालयात ६ आरोपींच्या विरोधात भा.दं.वि. १४३, १४७, १४८, ४२७, ३५४, ३५६, ३७९, ३२३ सह १४९ प्रमाणे आरोपपत्र दाखल केले. उपरोक्त घटना घडल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे अधिकाधिक ६० दिवसांच्या आत पोलिसांनी आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक होते; मात्र पोलिसांनी ते १५१ दिवस विलंबाने दाखल करून त्यांची निष्क्रीयताच दाखवली आहे. या विलंबामुळे पीडितेवर एक प्रकारे अन्याय झाला आहे. आरोपपत्र विलंबाने का दाखल केले गेले, याविषयी कोणतीही माहिती आरोपपत्रात आढळून येत नाही.

  • याप्रकारे गुन्हेगारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या आणि आरोपपत्र विलंबाने दाखल करून गुन्हेगारांना मोकळीक देणार्‍या पोलिसांना हिंदु राष्ट्रात कारागृहात टाकण्यात येईल !

असे अनुभव कुणाला आल्यास ते सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now