बेस्ट संपात तोडगा निघत नसल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ घंटे चर्चा होऊनही बेस्ट संपात तोडगा निघाला नाही. संपात तोडगा न निघाल्यास १२ जानेवारीपासून स्वच्छता कामगार आणि रुग्णालय कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. या संपाला पाठिंबा देण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे ६०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. बेस्टच्या संपाच्या विरोधात अधिवक्ता दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या वेळी झालेल्या सुनावणीच्या वेळी बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ३ सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव या तिघांचा समावेश आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now