श्री चामुंडादेवीचा यज्ञ चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सद्गुरु बिंदाताई यांच्या कपाळावर मळवट भरल्याप्रमाणे दिसून त्यांचा देह पुष्कळ तेजस्वी दिसणे

‘यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या आधी काही वेळ मी यज्ञस्थळी पोहोचलो. यज्ञस्थळापासून बर्‍याच दूर अंतरावर उभे राहून मी प्रार्थना करत असतांना मला सद्गुरु बिंदाताई यांचे मुखमंडल नेहमीसारखे वाटले नाही. त्यामुळे मी पुनःपुन्हा त्यांना पाहिले, तर त्यांचे मुखमंडल वेगळेच दिसू लागले. देवीला मळवट भरतात, तसा मळवट त्यांच्या कपाळावर भरल्याप्रमाणे दिसू लागले. त्यांची देहबोलीही नेहमीप्रमाणे न दिसता त्यांचा देह पुष्कळ तेजस्वी दिसत होता.

श्री. संदीप शिंदे

२. पूर्णाहुती चालू झाल्यावर पुन्हा सद्गुरु बिंदाताई यांच्या ललाटी मळवट भरल्याचे दिसून त्यांचा देह तेजस्वी दिसणे

नंतर काही क्षण यज्ञविधी थांबले असतांना सद्गुरु बिंदाताई मला नेहमीप्रमाणे दिसू लागल्या. त्यांच्या ललाटी असलेले कुंकू मला दुरूनही व्यवस्थित दिसत होते. थोड्या वेळाने पूर्णाहुती चालू झाली. मी सद्गुरु बिंदाताई यांच्याकडे पाहिले. तेव्हा पुन्हा त्यांच्या ललाटी मळवट भरल्यासारखे दिसू लागले आणि त्यांचा देह तेजस्वी दिसू लागला.

पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञविधींचे सूक्ष्म परीक्षण करणारे साधक श्री. निषाद देशमुख यांनी ‘यज्ञस्थळी श्री चामुंडादेवीचे अस्तित्व कोणकोणत्या घटकांतून जाणवले ?’, हे विस्ताराने सांगितले. तेव्हा मला ‘सद्गुरु बिंदाताईंच्या ठिकाणी देवीचे रूप दिसले’, या अनुभूतीचा अर्थ समजला आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.

– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now