रामनाथी आश्रमात २८ आणि २९.१२.२०१८ या दिवशी झालेल्या श्री चामुंडादेवी अन् श्री बगलामुखीदेवी या यज्ञांच्या वेळी आलेल्या अनुभूती

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या जागी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ दिसणे

‘२८.१२.२०१८ या दिवशी आश्रमात श्री चामुंडादेवीचा यज्ञ झाला. यज्ञाची पूर्णाहूती चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई हात जोडून उभ्या होत्या. त्या वेळी मला त्या पूर्णपणे पिवळ्या रंगाच्या दिसत होत्या. काही वेळा मला त्यांच्या जागी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ दिसल्या.

२. २९.१२.२०१८ या दिवशी झालेल्या श्री बगलामुखी यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्री. भूषण कुलकर्णी

२ अ. सकाळी गरुडाचे दर्शन होणे : यज्ञ चालू असतांना सकाळी १०:४० वाजता आकाशात गरुडाचे दर्शन झाले. त्या वेळी यज्ञस्थळी श्रीविष्णु उपस्थित असल्याचे जाणवले.

२ आ. यज्ञ चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या जागी मला देवीचे दर्शन झाले.

२ इ. यज्ञात आहुती दिलेल्या समिधा हाडांसारख्या दिसत असल्याचा विचार येणे आणि सूक्ष्म परीक्षण करणार्‍या साधकाने याला पुष्टी दिल्याने तो विचार योग्य असल्याचे लक्षात येणे : यज्ञात आहुती दिलेल्या समिधांकडे पाहिल्यावर ‘त्या हाडांसारख्या दिसत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. लगेचच सूक्ष्म परीक्षण करणारे साधक श्री. निषाद देशमुख यांनी सांगितले, ‘‘यज्ञातील लाकडांकडे पाहून ‘वाईट शक्तींचीच हाडे जळत आहेत’, असे जाणवते.’’ त्या वेळी ‘देवाने मला दिलेला विचार योग्यच होता’, हे माझ्या लक्षात आलेे.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२९.१२.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now