राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण

राहुल आणि सोनिया गांधी यांनी लपवले होते ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न !

  • उत्पन्न लपवून भ्रष्टाचार करणार्‍या काँग्रेसवर सरकारने बंदीच आणायला हवी ! अशा भ्रष्टाचारी पक्षाला देशावर ६० वर्षे राज्य करू देणारी लोकशाही निरर्थकच !
  • कुठलाही पक्ष सत्तेवर आला, तरी त्याला भ्रष्टाचार, बलात्कार, आतंकवादी आक्रमणे, हत्या आदी गुन्ह्यांचे काहीच वाटत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शासन होतांना दिसत नाही. परिणामी गेल्या ७१ वर्षांत गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे ! हे चित्र पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

नवी देहली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना प्राप्तीकर विभागाने ३१ डिसेंबर २०१८ या दिवशी १०० कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली. सोनिया आणि राहुल गांधी यांनी वर्ष २०११-१२ मध्ये त्यांचे एकूण ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले होते. त्यावरून प्राप्तीकर विभागाने हे पाऊल उचलले आहे. (३०० कोटी रुपयांची संपत्ती लपवल्यावर त्याच्या दुप्पट रक्कमेची भरपाई का नाही ? नुसती नोटीस बजावणे पुरेसे नाही. या पैशांची भरपाई करून घेण्यासह या दोघांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०१८ मध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे आणखी एक नेते ऑस्कर फर्नांडिस यांच्या २०११-१२ या वर्षातील प्राप्तीकराची पुन्हा चौकशी करण्यास अनुमती दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या संपत्तीचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर वर्ष २०११-१२ मध्ये राहुल गांधी यांचे उत्पन्न १५५ कोटी ४१ लाख रुपये, सोनिया गांधी यांचे उत्पन्न १५४ कोटी ९६ लाख रुपये, तर फर्नांडिस यांचे उत्पन्न ४८ कोटी ९३ लाख रुपये एवढे होते, असे निदर्शनास आले. हे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर ३१ डिसेंबरला सोनिया आणि राहुल गांधी या दोघांनाही नोटीस पाठवण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now