मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ (उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याचा प्रस्ताव

  • भाजपच्या राज्यातही हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
  • मंदिरांकडे कोणीही वक्रदृष्टीने पहाणार नाही, असे वातावरण भाजप सरकारकडून निर्माण करणे अपेक्षित आहे !

मथुरा – सुरक्षेच्या कारणास्तव मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह यांचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ (उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. श्रीकृष्ण जन्मस्थानच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयाला संमत्ती मिळण्यासाठी तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून निर्णय मिळाल्यानंतरच याविषयीची पुढील पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह परिसर उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यास तेथून विमान, हेलिकॉप्टर किंवा ‘ड्रोन’ यांच्या उड्डाणास बंदी असेल. मागील वर्षी श्रीकृष्ण जन्मस्थानच्या परिसरात २ ‘ड्रोन’ बराच वेळ फिरत होते. त्यावरून खळबळ उडाली होती. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now