निवडणूक आयोगाकडे ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी

हिंदूबहुल भारतात स्वातंत्र्यानंतरच्या ७१ वर्षांत हिंदूंचे हित साधणारा एकही राजकीय पक्ष निर्माण झाला नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत आले, तरी हिंदूंची गळचेपी चालूच आहे ! हिंदूंची ही दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

नवी देहली – आगामी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडे ८ जानेवारी या दिवशी ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली. यामध्ये भारतीय विकास दल, लोकतांत्रिक जनस्वराज पक्ष, नॅशनल अवामी युनायटेड पक्ष, पूर्वांचल नवनिर्माण पक्ष, राष्ट्रीय जनशक्ती समाज पक्ष, सकल जनुला पक्ष आणि स्वतंत्रता पक्ष यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात २ सहस्र नोंदणीकृत राजकीय पक्ष असून यांपैकी काही मोजक्याच पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आहे. या मान्यता असलेल्या एकूण पक्षांपैकी ७ राष्ट्रीय पक्ष, तर ५९ प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF