शंकराचार्य श्री श्री विदुशेखर भारती यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे हिंदु संस्कृतीनुसार विधीवत हवन करून अनेकांचा वाढदिवस एकत्रित साजरा !

मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) – हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा व्हावा, यासाठी येथे मागील ३ वर्षांपासून चालू असलेल्या ‘बर्थ डे हवन’ या कार्यक्रमाला शृंगेरीपिठाचे शंकराचार्य श्री श्री विदुशेखर भारती यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ६ जानेवारी या दिवशी मुलुंड (पश्‍चिम) येथील ब्रह्मांडेश्‍वर महादेव मंदिरात हा कार्यक्रमपार पडला. श्री. रूपेश शर्मा, श्री. अजित शर्मा आणि त्यांचे सहकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या वेळी शंकाराचार्य श्री श्री विदुशेखर भारती यांनी हिंदु धर्म म्हणजे सनातन धर्म असल्याचे सांगून जन्मापासून मृत्यूपर्यंत सनातन धर्मात सांगितलेल्या संस्कारांचे महत्त्व थोडक्यात विषद केले. या वेळी शंकाराचार्यांनी मंदिरात दर्शन घेऊन शिवपिंडीला अभिषेक केला. आयोजकांनी ‘बर्थ डे हवन’ या कार्यक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. नंतर शंकराचार्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाविषयी श्री. रूपेश शर्मा म्हणाले, सरकारने मुंबईमध्ये मागील ३ वर्षांपासून हिरानंदानी, घाटकोपर आणि मुलुंड येथे अशा प्रकारे हिंदु धर्मानुसार वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे अनेक हिंदू

पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार केक कापून आणि मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसाच्या दिवशी दीप विझवणे हे अशुभ आहे. हिंदु धर्मानुसार औक्षण करून वाढदिवस साजरा करायला हवा. अनेक हिंदूंना याविषयी माहिती नाही. आपल्या संस्कृतीचा प्रसार व्हावा, यासाठी प्रत्येक मासाच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी आम्ही सामूहिकरीत्या वाढदिवस साजरा करण्याचा विधी करतो. वाढदिवस असलेल्या व्यक्तीचे आरोग्य, ऐश्‍वर्य आणि दीर्घायुष्य यांची कामना करून विधीवत् हवन करण्यात येते. हा सर्व विधी विनामूल्य करण्यात येतो. आतापर्यंत अशा प्रकारे ३६ हवन करून अनेकांचे वाढदिवस हिंदु संस्कृतीनुसार साजरे करण्यात आले आहेत. आपल्या संस्कृतीचा प्रचार व्हावा, यासाठी संघटनेद्वारे अथवा व्यक्तीगतरित्या अशा प्रकारे विधीवत् वाढदिवस साजरा करावयाचा असल्यास ९३२३८२५८२४ या क्रमांकावर संपर्क करावा.’’


Multi Language |Offline reading | PDF