वादात सापडलेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन आज आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते होणार !

साहित्य क्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन होणार्‍या आणि वादात सापडलेल्या साहित्य संमेलनातून साहित्य क्षेत्राचा काय विकास होणार ?

महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर

यवतमाळ – ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ११ जानेवारीपासून येथे प्रारंभ होणार आहे. येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, पोस्टल ग्राऊंड येथे होणार्‍या या संमेलनाची सांगता १३ जानेवारीला होणार आहे. इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले उद्घाटनाचे निमंत्रण रहित केल्यामुळे संमेलन वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यानंतर उद्घाटनासाठी निमंत्रण दिलेल्या काही साहित्यिकांनी संमेलनाला येणार नसल्याचे सांगितले होते. या वादामुळे संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दोन दिवसांपूर्वी त्यागपत्र दिले.

अखेर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते हे उद्घाटन करण्याचे घोषित करून महामंडळाने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी यवतमाळमध्ये १० जानेवारीला ही घोषणा केली. त्यामुळे आता उपाध्यक्षच महामंडळाचे काम पहाणार आहेत. ‘संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार नाहीत’, अशी माहिती यवतमाळचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले मदन येरावार यांनी दिली आहे. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे होणार असून प्रकट मुलाखत आणि कविसंमेलन यांचाही समावेश आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now